विश्वास आटोळे यांची तालुकास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समितीच्या सदस्यपदी निवड

    शिर्सुफळ : बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील विश्वास तानाजी आटोळे यांची आज तालुकास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली.

    तसेच यामध्ये सहा निवडी झाल्या आहेत. संजय दुधाळ (उद्योग क्षेत्र ग्राहक), वैभव बरुंगले (कृषी क्षेत्र ग्राहक), विश्वास मांडरे (व्यवसायिक ग्राहक), सुनिल खलाटे (विज वितरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारी व्यक्ती), निलेश केदारी (विज वितरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारी). अशाप्रकारे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली.

    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, साबळेवाडी सरपंच गणेश शिंदे, वसंत गावडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, अशोक भगत, आदी मांन्यवर उपस्थित होते.