खळबळजनक! रेल्वे स्थानकातून १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार ;  दोन रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश,  ७ आरोपींनी आळीपाळीने बलात्कार केला

पिडीत मुलगी ३१ ऑगस्ट रोजी गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानक परिसरात आली होती. रात्री तिला आरोपींनी आता गाडी नाही. गावी कसी जाणार असे म्हणत आम्ही तुझी राहण्याची व्यवस्था करतो, असे सांगून बाहेर आणले. तिचे अपहरणकरून तिला वानवडी परिसरात नेले. त्याठिकाणी आरोपींनी रात्री तिच्यावर बलात्कार केला. तसेच, दुसऱ्या दिवशी देखील तिच्यावर बलात्कार करण्यात आला. एकूण ७ आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार काल उघडकीस आला आहे.

    पुणे :  पुण्यात रेल्वे स्थानक परिसरातून एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरणकरून रेल्वेतील दोन कर्मचारी तसेच रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याघटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीसांनी ८ आरोपींना अटक केली आहे.याप्रकरणी पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत १३ वर्षीय पिडीत मुलीने तक्रार दिली आहे. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी ३१ ऑगस्ट रोजी गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानक परिसरात आली होती. रात्री तिला आरोपींनी आता गाडी नाही. गावी कसी जाणार असे म्हणत आम्ही तुझी राहण्याची व्यवस्था करतो, असे सांगून बाहेर आणले. तिचे अपहरणकरून तिला वानवडी परिसरात नेले. त्याठिकाणी आरोपींनी रात्री तिच्यावर बलात्कार केला. तसेच, दुसऱ्या दिवशी देखील तिच्यावर बलात्कार करण्यात आला. एकूण ७ आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार काल उघडकीस आला आहे. त्यानंतर वानवडी पोलीसांनी तात्काळ या आरोपींचा शोध घेत त्यांना अटक देखील केली आहे. त्यावेळी यात दोन रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. तर, इतर रिक्षा चालक आहेत. दरम्यान, त्यांना सहाय्य करणाऱ्यांचा देखील पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत ८ आरोपींना अटक केली असल्याचे सांगण्यात आले आहे.