खळबळजनक! पुणे ते दिल्ली  विमान प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या बॅगेत काडतुसे आढळली

संबंधित व्यक्ती भोसरी परिसरातील आहे. ते सुरक्षा रक्षक एजन्सी चालवतात. त्यामुळे त्यांच्याकडे पिस्तूलाचा परवाना आहे. दरम्यान त्यांचं कुटुंब आज विमानाने पुण्यावरून दिल्ली येथे जाणार होते. त्यानुसार ते फ्लाईटच्या वेळेला आले. त्यांनी चेकिंग केली. याचवेळी येथील सुरक्षा विभागाला त्यांच्या बॅगेत ९ राउंड मिळून आले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला.

    पुणे : पुणे ते दिल्ली  विमान प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या बॅगेत काडतुसे आढळून आल्याने खळबळ उडाली. मात्र तपासणीत त्या प्रवाशाकडे परवाना असल्याचे तसेच पत्नीकडून चुकीने बॅगेत राउंड आल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी याची नोंद करत ते राउंड परत केले. पण, काही काळ यामुळे विमानतळावर चांगलाच गोंधळ उडाला होता.याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती भोसरी परिसरातील आहे. ते सुरक्षा रक्षक एजन्सी चालवतात. त्यामुळे त्यांच्याकडे पिस्तूलाचा परवाना आहे. दरम्यान त्यांचं कुटुंब आज विमानाने पुण्यावरून दिल्ली येथे जाणार होते. त्यानुसार ते फ्लाईटच्या वेळेला आले. त्यांनी चेकिंग केली. याचवेळी येथील सुरक्षा विभागाला त्यांच्या बॅगेत ९ राउंड मिळून आले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यांनी सुरक्षा विभागाला सर्व माहिती दिली. त्यानंतर सुरक्षा विभागाने हा प्रकार विमानतळ पोलिसांकडे सुपूर्द केला. त्यानंतर पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली. त्यानंतर चौकशीत संबंधित व्यक्तीकडे लायसन असल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्या पत्नीकडून बॅग भरत असताना काडतुसे असलेली पिशवीही त्यात टाकण्यात आली. त्यामुळे हा प्रकार घडला असल्याची माहिती विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी दिली.