Leopard Attack
संग्रहित फोटो

कात्रजला गुजर निंबाळकरवाडी भाग आहे. आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास येथील रहिवासी असलेल्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यांनी तात्काळ ही माहिती वनविभाग व भारती विद्यापीठ पोलीसाना दिली. माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी प्रथम येथे धाव घेतली. तसेच वनविभागाला माहिती कळवली. त्यानंतर वनविभाग देखील येथे दाखल झाले.

    पुणे : पुण्याच्या कात्रजमध्ये येथील नागरिकांना बिबट्या दिसल्याचा प्रकार समोर आला आहे. अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस व वनविभाग येथे दाखल झाले असून, बिबट्याचा शोध घेतला जात आहे. तर नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

    कात्रजला गुजर निंबाळकरवाडी भाग आहे. आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास येथील रहिवासी असलेल्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यांनी तात्काळ ही माहिती वनविभाग व भारती विद्यापीठ पोलीसाना दिली. माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी प्रथम येथे धाव घेतली. तसेच वनविभागाला माहिती कळवली. त्यानंतर वनविभाग देखील येथे दाखल झाले.

    अंधारात काही वेळ बिबट्याचा शोध घेतला. पण, नंतर त्याचे दर्शन झाले नाही. पण, यावेळी बिबट्याला प्रत्यक्षात पाहणाऱ्या नागरिकांनी त्याबाबत माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी नागरिकांना योग्य सूचना दिल्या. तर नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि काही माहिती असल्यास कळविण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान पुण्यात बिबट्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली आहे.