नागरिकांच्या तक्रारींसाठी पुणे महापालिकेत स्वतंत्र कक्ष ; पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुविधा

पावसाळ्यामध्ये अनेकवेळा नागरिकांच्या घरामध्ये रस्त्यावरील पाणी शिरणे, रस्त्यावर खड्डे पडणे, यांसारख्या गोष्टींचा सामना करावा लागतो. अशा वेळी नागरिकांना महापालिका प्रशासनाकडे तक्रार करता यावी, तसेच त्यांच्या तक्रारींवर आवश्क ती कार्यवाही करताना यावी, पावसाच्या प्रमाणाची नोंद घेता यावी, पावसाच्या पाण्याचा निचरा त्वरीत होण्यासाठी उपाय योजना करणे, रस्त्यावरील खराड भाग त्वरीत दुरस्त करणे, रस्त्यावरील खड्डे बुजविणे, या गोष्टी तातडीने कराता याव्यात, यासाठी महापालिकेतील पथ विभागातील खोली नं. १२९ येथे स्वतंत्र कक्ष कार्यान्वीत ठेवण्यात आला आहे.

    पुणे : पावसाळ्यामध्ये नागरिकांना निर्माण होणाऱ्या तक्रारींची दखल घेण्यासाठी त्या सोडवण्याच्या दृष्टीने कार्यवही करण्यासाठी महापालिकेमध्ये स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आला आहे. हा कक्ष चोवीस तास नागरिकांच्या सेवेत कार्यरत राहणार असल्याचे महापालिकेच्या पथ विभागाने सांगितले आहे.

    पावसाळ्यामध्ये अनेकवेळा नागरिकांच्या घरामध्ये रस्त्यावरील पाणी शिरणे, रस्त्यावर खड्डे पडणे, यांसारख्या गोष्टींचा सामना करावा लागतो. अशा वेळी नागरिकांना महापालिका प्रशासनाकडे तक्रार करता यावी, तसेच त्यांच्या तक्रारींवर आवश्क ती कार्यवाही करताना यावी, पावसाच्या प्रमाणाची नोंद घेता यावी, पावसाच्या पाण्याचा निचरा त्वरीत होण्यासाठी उपाय योजना करणे, रस्त्यावरील खराड भाग त्वरीत दुरस्त करणे, रस्त्यावरील खड्डे बुजविणे, या गोष्टी तातडीने कराता याव्यात, यासाठी महापालिकेतील पथ विभागातील खोली नं. १२९ येथे स्वतंत्र कक्ष कार्यान्वीत ठेवण्यात आला आहे. हा कक्ष चोवीस तास नागरिकांच्या सेवेत कार्यरत राहणार असून नागरिकांनी आपल्या तक्रारी ०२० २५५०१०८३ या संपर्क क्रमांकावर नोंदविण्याचे आवाहन प‌‌थविभागाने केले आहे.