covid vaccine

पुणे. सध्या प्रत्येक जण कोरोनावरच्या लसीची चातकासारखी वाट बघतोय पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युमार्फत (serum institute of india) ऑक्सफर्डच्या कोरोना लसीचे (corona vaccine) क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. ही लस इंजेक्शनमार्फत मार्फत देण्यात येईल. मात्र आता भारतात फक्त इंजेक्शनमार्फतच नाही तर नाकावाटेही कोरोना लस दिली जाणार आहे. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने याचे उत्पादन देखील सुरु केले आहे.

अमेरिकेच्या कोडाजेन्सिक्स या कंपनीने नाकावाटे दिली जाणारी कोरोना लस तयार केली आहे. CDX-005 असे या लसीचे नाव आहे. या लशीत पुण्याच्या सीरम संस्थेची भागीदारी आहे. या लसीच्या प्री-क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या असून आता लवकरच क्लिनिल चाचण्या होणार आहेत. डाजेन्सिक्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,  कोरोना लसीचे भारतात उत्पादनाला करायला सीरम इन्स्टिट्युटला परवानगी मिळाली आहे. भारताच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या  रिव्ह्यु कमिटी ऑफ जेनेटिक मॅनिप्युलेशनने ही परवानगी दिली आहे.