Corona vaccination will begin in India in January, Poonawala said

नविन वर्षात देशात कोरोना लसीकरण मोहिम सुरु होण्याची शक्यता आहे. सीरम इंन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना लशीसंबंधी महत्वाची माहिती दिली आहे.

पुणे : नविन वर्षात देशात कोरोना लसीकरण मोहिम सुरु होण्याची शक्यता आहे. सीरम इंन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना लशीसंबंधी महत्वाची माहिती दिली आहे.

आमच्याकडे सध्या ५ कोटी डोस स्टॉकमध्ये आहेत. काही दिवसामध्ये आम्हाला नियामक मंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचे पुनावाला म्हणाले. मान्यता मिळाल्यानंतर केंद्र सरकारला ठरवायचं आहे की किती लवकर आणि किती लशीचे डोस ते घेऊ शकतात. जूलै २०२१ पर्यंत जवळपास ३० कोटी कोरोना लशीचे डोस तयार करु शकतो असंही पुनावाला यांनी सांगीतले.

‘भारत कोवॅक्स’चा भाग आहे. त्यामुळे सीरम इंन्स्टिट्यूटमध्ये जे काही उत्पादन होईल त्यातील ५० टक्के भारतीयांसाठी राखीव असेल. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाला पहिल्या टप्प्यात आम्ही ५ कोटी लशीचे डोस देऊ शकू, असंही त्यांनी सांगीतले आहे.

२०२१ च्या पहिल्या सहा महिन्यात जगभरात कोरोना लशीची कमतरता भासेल. पण, त्याला काही पर्याय नाही. २०२१ च्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यापासून लस मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागतील. यानंतर परिस्थिती नियंत्रणात येईल आणि जास्तीत जास्त देशांना मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होईल. सीरम इन्स्टिट्यूट मध्ये तयार होत असलेली ‘कोविशिल्ड’ ही लस ९० टक्के परिणामकारक दिसून आली आहे.