बाहेरगावातून  येणाऱ्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी भरारी पथके नेमावी; मंत्री वळसे पाटील यांची सुचना

मंचर : आंबेगाव विधानसभा मतदार संघात अन्य भागातुन येणाऱ्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी भरारी पथके नेमली जाणार आहेत. तसेच आरोग्य तपासणी केल्यानंतरच गावात प्रवेश द्यावा. याबाबतची कार्यवाही पोलीस आणि

मंचर : आंबेगाव विधानसभा मतदार संघात अन्य भागातुन येणाऱ्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी भरारी पथके नेमली जाणार आहेत. तसेच आरोग्य तपासणी केल्यानंतरच गावात प्रवेश द्यावा. याबाबतची कार्यवाही पोलीस आणि आरोग्य विभागांनी करावी,अशी सुचना कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी दिली.

अवसरी फाटा (ता.आंबेगाव) येथे घेण्यात आलेल्या आढावा  बैठकीला उपविभागीय अधिकारी जितेंद्र डुडी,संतोष देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, तहसिलदार रमा जोशी,लैला शेख,गटविकास अधिकारी जालिंदर पठारे,भाऊसाहेब ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी सुरेश ढेकळे,पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे, सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदीप पवार, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा,सभापती संजय गवारी उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांना मास्क, सॅनीटायझर, हॅडग्लोज तसेच उपकरणे, औषधे व शुद्ध पाणी पुरविले जाईल. वैद्यकिय सुविधांसाठी आमदार निधीतून ५० लक्ष रुपये दिले असून प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपजिल्हा रुग्णालय मंचर, ग्रामीण रुग्णालय घोडेगाव यासाठी आवश्यक साहित्य घेण्यात आले आहे.बाहेरगावावरुन आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी, दैनिक अहवाल याबाबत चर्चा झाली. महसूल,पोलीस,आरोग्य व ग्रामपंचायत यामार्फत संपूर्ण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याबाबत अतिशय उत्तम काम सुरु असल्याचे यावेळी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.  सध्या आरोग्य यंत्रणेस आमदार निधी व महाराष्ट्र सरकारमार्फत वैद्यकीय साधनसामग्री पुरविण्यात आलेली आहे.वैद्यकीय साधनसामग्री आवश्यक आहे. ती भीमाशंकर सहकारी साखर कारखाना,पराग मिल्क फूड्स लि.यांच्या कडुन उपलब्ध करुन  देण्यात येईल. अन्य शहरातून आलेल्यांचा शोध घेण्यासाठी भरारी पथक नेमले जाईल.आरोग्य तपासणी झाल्यानंतरच गावात प्रवेश करावा. याची कार्यवाही पोलीस व आरोग्य यंत्रणेमार्फत करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. सहकारमहर्षी स्व.दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमाचा खर्च टाळून ५ लाख रुपयांचा निधी आरोग्याच्या सुविधा पुरविणेसाठी देणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.