कंटेनमेंट झोनमधील साडेसात लाख लोकांचे  होणार  स्क्रिनिंग

पुणे : महापालिकेने जाहीर केलेल्या कंटेनमेंट झोन मध्ये मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम सुरू केली असून, १ लाखांपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. आत प्रभावित पाच क्षेत्रिय कार्यालय परिसरातील रेड झोनमधील सुमारे साडेसात लाख लोकांच्या  लोकांच्या  स्क्रनिंगचे काम हातात घेण्यात आले आहे.  येत्या सात दिवसात या भागातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी होणार आहे.

पुणे  : महापालिकेने जाहीर केलेल्या कंटेनमेंट झोन मध्ये मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम सुरू केली असून, १ लाखांपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. आत प्रभावित पाच क्षेत्रिय कार्यालय परिसरातील रेड झोनमधील सुमारे साडेसात लाख लोकांच्या  लोकांच्या स्क्रिनिंग काम हातात घेण्यात आले आहे.  येत्या सात दिवसात या भागातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी होणार आहे. 
शहरातील ५ प्रमुख क्षेत्रिय कार्यालय परिसरात यात येरवडा, भवानी पेठ, शिवाजीनगर-घोलेरस्ता, कसबा-विश्रामबागवाडा, ढोले पाटील रस्ता भागात महापालिकेने स्वयंसेवी संस्थांच्या मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅनच्या माध्यमातून १ लाख २ हजार नागरिकांची तपासणी केली आहे. त्यात २००  बाधित सापडले आहेत. महापालिका अतिरक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.
कंटेनमेंट झोनमधील प्रत्येकाची तपासणी करण्याचे काम सध्या सुरू आहे. याकरिता पालिकेच्या १३ मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनसह शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या ६० व्हॅनही खासगी डॉक्टरांसह या कार्यात सहभागी झाल्या आहेत. या माध्यमातून आता रेड झोन, हॉटस्पॉटमधील दाट वस्ती व ८ प्रमुख झोपडपट्टी भागावर लक्ष केंद्रित करून ट्रेसिंग व टेस्टिंगवर अधिक लक्ष देण्यात येत आहे.
मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनच्या माध्यमातून आत्तापर्यंत करण्यात आलेल्या तपासणीतून २०० जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले असून, त्यांना विविध रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर ज्यांना कोरोना संबंधित लक्षणे आढळून आले आहे, अशा नागरिकांना त्यांच्या घरापासून दूरच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये न हलविता, त्याच परिसरातील शाळांमध्ये क्वारंटाईन करण्यात येत आहे. परिणामी संबंधित व्यक्तीही या क्वारंटाईन होण्यास तयार होत असून, आपण घरापासून दूर नसल्याची भावनाही त्याच्यात निर्माण होत असून त्याचे आता प्रशासनाला पूर्ण सहकार्य मिळत आहे अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.