विवाहितेच्या छळप्रकरणी सात जणांवर गुन्हे दाखल

शिक्रापूर: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) नजीक असलेल्या वाडागाव येथे राहणाऱ्या महिलेचा सासरच्या लोकांनी विवाहितेला स्वयंपाक येत नाही असे म्हणून तसेच गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये या कारणातून मारहाण करत छळ केल्याप्रकरणी विवाहितेच्या पती सह सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.                     

वाडागावठाण (ता. शिरूर) येथील विवाहितेचे लग्न झाल्यानंतर विवाहिता नाशिक येथे नांदत असताना विवाहितेचा विवाहितेचा पती, सासू, पतीचे मामा मामी, पतीच्या मामाची मुले व नणंद हे सर्वजन मिळून तिला स्वयंपाक येत नाही, काम करत नाही, असे म्हणून तिचा शारीरिक, मानसिक छळ करून तिला नेहमी उपाशी ठेवत मारहाण करू लागले. याबाबत विवाहितेने नाशिक येथील पोलीस स्टेशन येथे देखील यापूर्वी तक्रारी दिल्या त्यांनतर काही दिवसांनी विवाहितेला तू माहेरहून गाडी घेण्यासाठी पन्नास हजार रुपये घेऊन ये, असे म्हणून देखील विवाहितेला मारहाण करू लागले, याबाबत विवाहितेने वारंवार तिच्या आई वडिलांना सांगितले असता विवाहितेच्या आई वडिलांनी सर्वांची समजूत काढून समजविण्याचा प्रयत्न केला मात्र विवाहितेच्या घरच्या व्यक्तींमध्ये काहीही बदल झाला नाही वारंवार विवाहितेला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला जाऊ लागला तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली जाऊ लागली. याबाबत पल्लवी निलेश निकम रा. सिल्वर नेस्ट सोसायटी वाडागावठाण ता. शिरूर जि पुणे मूळ रा. गिरीजाई अभ्यासिका समोर पवननगर सिडको जि. नाशिक यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी विवाहितेचा पती निलेश रामभाऊ निकम, सासू संगीता रामभाऊ निकम, पतीचे मामा रावसाहेब तबाजी रणधीर, मामी नंदा रावसाहेब रणधीर, पतीच्या मामाचा मुलगा शुभम रावसाहेब रणधीर, आनंद रावसाहेब रणधीर, नणंद वर्षा सचिन गांगुर्डे सर्व रा. गिरीजाई अभ्यासिका समोर पवननगर सिडको (जि. नाशिक) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.