बारामतीत सात दिवसांचा लॉकडाऊन ; दवाखाने ‌मेडिकल वगळता सर्व सेवा बंद राहणार

बारामती शहर व तालुक्यामध्ये सध्या कोरोना बाधितांची संख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. दररोज मयत होणाऱ्यांची संख्याही कमी होत नाही. सध्या लॉक डाऊन सुरू असूनही बारामती शहरात रस्त्यावरील गर्दी कमी होत नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करून बारामती मध्ये सात दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यासंदर्भात प्रशासनाने निर्णय घेण्याची सूचना केली होती.

    बारामती :  बारामती शहर व तालुक्यामध्ये दररोज कोरणा बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने बारामती शहर व तालुक्यामध्ये सात दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या सात दिवसात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात न आल्यास आणखी सात दिवसांचा लॉकडाऊन वाढविण्यात येणार आहे. हॉस्पिटल्स व मेडिकल दुकाने वगळता इतर सर्व सेवा बंद राहणार आहेत, दूध विक्री सकाळी सात ते नऊ या वेळेत सुरू राहणार आहे.

    बारामती शहर व तालुक्यामध्ये सध्या कोरोना बाधितांची संख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. दररोज मयत होणाऱ्यांची संख्याही कमी होत नाही. सध्या लॉक डाऊन सुरू असूनही बारामती शहरात रस्त्यावरील गर्दी कमी होत नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करून बारामती मध्ये सात दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यासंदर्भात प्रशासनाने निर्णय घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार आज दिनांक ३  मे रोजी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस तहसीलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे, सिल्व्हर जुबली शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सदानंद काळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी तसेच व्यापारी उपस्थित होते. यावेळी लॉकडाऊन बाबत व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना मांडल्या. यामध्ये काही दुकाने बंद, काही सुरू असे न करता सरसकट सेवा सात दिवस बंद ठेवाव्यात, सूचना मांडण्यात आल्या. त्यानुसार सात दिवस कडकडीत बंद ठेवण्याच्या सूचनेवर एकमत झाले. त्यानुसार दिनांक ५ मे मध्यरात्री पासून कडक लॉकडाऊन सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान बारामती शहरात दिनांक ५ एप्रिल पासून लॉक डाऊन सुरू आहे, मात्र सकाळी सात ते अकरा दरम्यान या वेळेत किराणा, भाजीपाला, बेकरी व्यवसाय सुरू होते. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होत नव्हती. या सात दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये वैद्यकीय सेवा वगळता अन्य सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या नवीन सात दिवसांच्या बंदमुळे बारामती ४० दिवसांचा लॉक डाऊन झाला आहे. मंगळवारी दिनांक 5 मे रोजी मध्यरात्रीपासून या नवीन कडक लॉक डाऊन ची अंमलबजावणी होणार आहे.