भोसरीत सात लाखाची घरफोडी; पोलिसांचा तपास सुरु

घरातील लाकडी कपाटाचे कुलूप तोडून आतील ४८२ ग्रॅम वजनाचे ७ लाख २२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

    पिंपरी: दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी ७ लाख २२ हजार रुपयांचे ४८ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत दीपक रमेश ओसवाल (वय ३८, रा. सँडविक कॉलनी, दिघी रोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    फिर्यादी ओसवाल यांचे घर सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान बंद होते. चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटला. घरातील लाकडी कपाटाचे कुलूप तोडून आतील ४८२ ग्रॅम वजनाचे ७ लाख २२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

    उड्डाणपुलाखालून दुचाकी चोरीला

    भोसरी उड्डाणपुलाखाली उभी केलेली दुचाकी चोरट्याने लांबवली. ही घटना २८ जून रोजी उघडकीस आली. याप्रकरणी एका महिलेने रविवारी (दि. ४) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २८ जून रोजी पहाटे पावणेसहा वाजता फिर्यादी महिलेने आपली २० हजार रुपये किंमतीची दुचाकी भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहासमोर उड्डाणपुलाखाली उभी केली होती. चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली. सकाळी सव्वादहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.