खेड घाटाच्या कामात अनेक त्रुटी : सखोल चौकशी करण्याची समन्वय दिलीप मेदगे यांची गडकरींकडे मागणी

खेड घाटाचे रोडवेज सोलुशन या कंपनीने काम सुरू केले. मुदत संपूनही सदर काम सुरू आहे. वारंवार सर्वांनी आग्रह धरल्याने त्यातील एक लाईन सुरू करण्यात आली आहे. या कामाला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे स्वीय सहाय्यक संकेत भोंडवे यांनीही दोन वेळा पाहणी दौरा केला.  खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या पाहणी दौऱ्यात ३० जून रोजी महामार्ग खुला करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला. मात्र अजूनही काम संथपणे चालू आहे.

  राजगुरूनगर : येथील खेड घाटाचे काम दोन वर्षांनंतरही अपूर्णच आहे. तारीख पे तारीख देत चालढकल करण्याचे धोरण ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी अवलंबिले आहे. या सर्वांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी या प्रकल्पावर समन्वयक म्हणून नियुक्ती झालेले दिलीप मेदगे यांनी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

  हे काम मिळालेली आयएफएसएल कंपनी दिवाळखोरीत गेली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष घालून या सर्वच कामांना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी दिली व तातडीने निधी उपलब्ध करून दिला. खासदार डॉ. अमोल कोल्हे हेही महामार्गावरील कामांतील प्रगती व अडीअडचणी यात लक्ष घालत आहेत. व माजी खासदार आढळराव पाटील हेही कामांची पाहणी करत असतात.

  खेड घाटाचे रोडवेज सोलुशन या कंपनीने काम सुरू केले. मुदत संपूनही सदर काम सुरू आहे. वारंवार सर्वांनी आग्रह धरल्याने त्यातील एक लाईन सुरू करण्यात आली आहे. या कामाला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे स्वीय सहाय्यक संकेत भोंडवे यांनीही दोन वेळा पाहणी दौरा केला.  खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या पाहणी दौऱ्यात ३० जून रोजी महामार्ग खुला करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला. मात्र अजूनही काम संथपणे चालू आहे.

  घाटामध्ये उताराच्या बाजूच्या गटरची कामे निष्कृष्ट पद्धतीची झाली आहेत. त्याचप्रमाणे अजूनही घाटामध्ये काही ठिकाणी तीव्र उताराची बाजू कमी करणे गरजेचे आहे. त्यातच कंपनीने गणायटिंग (डोंगर प्लास्टरचे)चे काम भर पावसात सुरू केले. हे काम करतेवेळी कोणत्याही सुरक्षा साधनांचा वापर केला जात नाही. त्यामुळे जीवितहानी होऊ शकते. रस्त्याच्या बाजूचे काँक्रीट भिंतीचे काम जवळून पाहिले असता खाली वर झालेले आहे. कुठलीही लेव्हल त्यामध्ये नाही. नुकताच कंपनीमुळे शेतकऱ्याला साडेतीन कोटीचा दंड झालेला आहे. कामातील अनेक चुका या कंपनीने केलेले आहेत.

  या सर्व घटकांवर प्राधिकरणाचे अनिल गोरड हे एक अत्यंत कमी अनुभवी अधिकारी काम पाहतात. व इतक्या मोठ्या कामांमध्ये एकाच शाखा अभियंता स्तरावरील अधिकाऱ्याला ही जबाबदारी दिली आहे. खरे तर एवढ्या मोठ्या रस्त्यावरती किमान पाच ते दहा अधिकारी कामाचे देखरेख करण्यासाठी नेमण्याची आवश्यकता आहे. असे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिले असल्याची माहिती मेदगे यांनी ‘दैनिक नवराष्ट्र’शी बोलताना सांगितले.

  या भागातील अनेक उच्चशिक्षित सिव्हिल इंजिनिअर बेरोजगार आहेत त्यांनाही हा प्रकल्प पूर्ण होई पर्यंत भारत सरकारने ही नियुक्ती द्यावी. असा प्रस्ताव सादर केला आहे. यातून स्थानिक अभियंत्यांना रोजगार मिळू शकेल व महामार्गाची कामे ही चांगली होतील, असा विश्वास स्थापत्य अभियंता संघटनेचे संस्थापक असलेले मेदगे यांनी व्यक्त केला.

  अनिल गोरड याच्याकडे अनेकदा वृत्तपत्र प्रतिनिधींनी काही माहिती मागितल्यास ते टाळाटाळ करतात. स्थानिक ठेकेदार घोलप हे देखील ईतर कामे उपठेकेदारांना दिली आहेत, त्यांनाच जाब विचारा, अशी उद्धट उत्तरे देतात.  असा अनुभव मंत्री गडकरी यांनी नियुक्त केलेल्या मेदगे यांनाही आला.

  खेड घाटाबाबत अजून पाऊस जोरात नसल्यामुळे इथे यांचे पितळ उघडे पडले नाही. परंतु मोठ्या पावसामध्ये घाटांमध्ये दरडी कोसळणे, व कॉंक्रीट गटाराचे निकृष्ट काम यामुळे रस्ता वारंवार बंद पडण्याची शक्यता पुढे नाकारता येत नाही. कंपनीचे अधिकारी घोलप हेही कायम उडवाउडवीची उत्तरे देतात. अनिल गोरड यांच्या बाबतीत वरिष्ठ राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांच्याकडे तक्रार केली असता त्यांचेही ऐकायला हा मुजोर अधिकारी तयार नाही. खेड घाट व नारायणगाव उर्वरित बायपास चे काम हे ७८ कोटी रुपयाचे असून या कंपनीने ते अठरा टक्के कमी दराने निविदा भरलेली आहे. व त्यातून ही कंपनी एनएचएआयला पहिल्यांदाच काम करत आहे. त्यातील बरीचशी कामे यांनी सब कॉन्ट्रॅक्टर नेमून अजून कमी दराने दिल्यामुळे त्याची गुणवत्ता खराब झाली आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग कामाचे गुणवत्तेबाबत लेखी तक्रार वरिष्ठांकडे करणार आहे.

  दिलीप मेदगे, समन्वयक, पुणे नाशिक महामार्ग