इंदापूर तालुक्यात वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान

इंदापूर : तालुक्याला शनिवारी रात्री विजेच्या कडकडाटात वादळी वारे व अवकाळी पावसाने झोडपल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर तब्बल दीड तास पाऊसाने हजेरी लावल्याने रात्रीच्या वेळी तालुक्यातील संपूर्ण जनजिवन विस्कळीत झाले होते.

 तालुक्यात मेघगर्जनेसह गारांचा वादळी पाऊस

इंदापूर  : तालुक्याला शनिवारी रात्री विजेच्या कडकडाटात वादळी वारे व अवकाळी पावसाने झोडपल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर तब्बल दीड तास पाऊसाने हजेरी लावल्याने रात्रीच्या वेळी तालुक्यातील संपूर्ण जनजिवन विस्कळीत झाले होते. तालुक्यातील आनेक भागामध्ये डाळींब, केळी, द्राक्ष, पपई, खरबुज,कलिंगड पिकांसह, ऊस, मका, उन्ळाळी बाजरी, तरकारी भाजीपाला, यासारखी पीके वादळी पावसाने भुईसपाट झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असुन, जगावे की मरावे हा प्रश्न शेतकर्‍यापुढे आ वासुन उभे असल्याने शासन स्तरावरून आर्थीक मदतीची मागणी शेतकरी करत आहेत.

-शेतकर्‍यांना नुकसानीचा मोठा फटका बसला

शनिवार (दि.१८) रोजी दिवसभर वातावरणात मोठ्याप्रमाणात उष्णता जानवत असल्याने सायंकाळी पाच वाजलेपासुन आकाशात ढगांची गर्दी होताना दीसत होती. तर सायंकाळी आठच्या दरम्यान वादळी वारे वाहु लागले. त्यानंतर तासाभरात विजांच्या कडकडाटात व गारांच्या वर्षावासह पावसाला सुरूवात झाली. या पावसाबरोबर वादळी वार्‍याला मोठा वेग असल्याने तालुक्याच्या पूर्व व पश्चींम भागातील शेतकर्‍यांच्या शेतातील उभी पीके मुळासकट उपटुन जमीनदोस्त झाली. तास ते दीड तास पावसाने वादळी वार्‍यासह हजेरी लावल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांना आसमानी संकटाच्या नुकसानीचा मोठा फटका बसला आहे. 

– शेतकर्‍यांवर दुख्खाचा डोंग कोसळला
तालुक्याच्या पश्चिंम भागात द्राक्ष, डाळींब व उस पिकांचे मोठे नुकसान झाले असुन काढणीसाठी हाता तोंडाला आलेला शेतातील पिकांचा घास अवकाळी पावसाने हिरावुन घेतल्याने शेतकर्‍यांवर दुख्खाचा डोंग कोसळला आहे. तर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये ऊस, मका, उन्हाळी बाजरी, कांदा पिकांचे मोठे नुकसान होऊन उभी पीके भुइसपाट झाल्याने शेतकर्‍यांना नुकसानीचा मोठा फटका बसला आहे. तर कोरोनाचे वादळ व त्यातच अवकाळीचे वादळ या दोन्हींच्या मध्ये तालुक्यातील शेतकरी सापडल्याने पुरता भरडला गेला असुन शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाईबाबत शासन पातळीवर कसलीही भूमीका घेत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होताना दिसुन येत आहे.