लोणावळ्यात मुंबईच्या व्यक्तीकडून व्हॉट्सअपच्या माध्यमातून सेक्स रॅकेट ; छापा कारवाईत एकाला अटक

लोणावळ्यात पुणे, मुंबईसह बाहेरून नागरिक पर्यटनासाठी येतात. त्यामुळे येथील अवैध प्रकारांवर पोलीसांकडून कडक कारवाई केली जाते. यादरम्यान, एकजण सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री झाल्यानंतर छापा कारवाई करण्यात आली. दलाल धनंजय राजभर याला पकडल्यानंतर त्याच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    पुणे :  पर्यटन क्षेत्र असलेल्या लोणावळ्यात मुंबईच्या व्यक्तीकडून व्हॉट्सअपच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालविला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामीण पोलीसांनी छापा कारवाई केल्यानंतर हे उजेडात आले आहे. येथून दिल्ली व छत्तीसगड येथील महिलांची सुटका केली आहे.
    याप्रकरणी धनंजय कटवारू राजभर (रा. चेंबूर, मुंबई) याला अटक केली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    लोणावळ्यात पुणे, मुंबईसह बाहेरून नागरिक पर्यटनासाठी येतात. त्यामुळे येथील अवैध प्रकारांवर पोलीसांकडून कडक कारवाई केली जाते. यादरम्यान, एकजण सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री झाल्यानंतर छापा कारवाई करण्यात आली. दलाल धनंजय राजभर याला पकडल्यानंतर त्याच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    धनंजय हा मुंबईचा असून, तो व्हॉट्सअपच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवत होता. तो ग्राहकांना व्हॉट्सअपवर मुली व महिलांचे फोटो पाठवत असत. त्यानंतर त्यांना वेश्या मगनासाठी पाठवत असत. चेंबरला बसून तो लोणावळ्यातील सेक्स रॅकेट चालवत होता. त्यामुळे त्याला स्थानिक व्यक्तीची मदत असण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार तपास सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले. त्याच्या ताब्यातून दिल्ली व छत्तीसगड येथील मुलींची सुटका केली आहे.

    लोणावळ्यातील वर्सोली भागात महिला उपलब्ध करुन देऊ शकतो, असं आरोपीनं सांगितलं होतं. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होती. एक गाडी आली. पोलिसांनी दलाल राजभर यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या तर दोन महिलांना ताब्यात घेण्यात आलं.