बनावट ई पास तयार करुन देणार्‍याला बेड्या

लॉकडाऊन काळात जिल्ह्याबाहेर जायचे असेल तर ई पास अत्यावश्यक करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके यांना एकाच लॅपटॉपवरुन अनेक ई पास येत असल्याचे लक्षात आले. धनाजी गंगनमले हा स्वत:च्या घरात वेबसाईटवरुन ई पास तयार करुन त्यामधील मजकुरामध्ये फेरफार करुन शासनाची व ई पास धारकांची फसवणूक करुन बनावट ई पास तयार करुन तो खरा असल्याचे भासवून त्यावर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो वापरुन ई पासची विक्री करीत असत्याचे आढळून आले.

    पुणे : लॉकडाऊन जारी झाल्यानंतर अत्यावश्यक कामासाठी दुसर्‍या जिल्ह्यात अथवा दुसर्‍या राज्यात जायचे असेल तर ई पास आवश्यक करण्यात आला आहे. मात्र, हा ई पास तयार करुन घेताना चुकीची कारणे दिली अथवा अनोळखी माणसांकडून पैसे देऊन पास काढून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण पुणेपोलिसांनी अशाच प्रकारे चुकीची कारणे देऊन तब्बल १८ जणांना डिजिटल पास काढून देणार्‍यास जेरबंद केले आहे.
    धनाजी मुरलीधर गंगनमले (वय २९, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) असे त्याचे नाव आहे. लॉकडाऊन काळात जिल्ह्याबाहेर जायचे असेल तर ई पास अत्यावश्यक करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके यांना एकाच लॅपटॉपवरुन अनेक ई पास येत असल्याचे लक्षात आले. धनाजी गंगनमले हा स्वत:च्या घरात वेबसाईटवरुन ई पास तयार करुन त्यामधील मजकुरामध्ये फेरफार करुन शासनाची व ई पास धारकांची फसवणूक करुन बनावट ई पास तयार करुन तो खरा असल्याचे भासवून त्यावर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो वापरुन ई पासची विक्री करीत असत्याचे आढळून आले.