शरद पवारांनी घेतली राजनाथ सिंगांची भेट, हे आहे कारण

पुणे विमानतळावरील भार कमी करण्यासाठी पुरंदरमध्ये नवा विमानतळ स्थापन करावा, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून समोर येते आहे. तसा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला दिला आहे. या प्रस्तावावर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी, अशी विनंती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली.

पुण्यातील विमानतळावर गेल्या काही वर्षांपासून वाहतुकीचा भार वाढत असून त्याला पर्यायी विमानतळ उभं करणं ही सध्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून याबाबत चर्चादेखील सुरू आहेत. मात्र पर्यायी विमानतळ कुठे असावा आणि त्याची रचना कशी असावी, याबाबत मतमतांतरं आहेत.

पुणे विमानतळावरील भार कमी करण्यासाठी पुरंदरमध्ये नवा विमानतळ स्थापन करावा, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून समोर येते आहे. तसा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला दिला आहे. या प्रस्तावावर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी, अशी विनंती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली.

पुरंदरच्या विमानतळाचे काम जलदगतीनं सुरू व्हावं आणि त्याला प्राधान्यक्रम मिळावा, अशी विनंती शरद पवार यांनी राजनाथ सिंगांकडे केली. त्यानंतर केलेल्या ट्विटमधून पवारांनी याबाबतची माहिती दिलीय. ते म्हणतात, “पुणे शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई वाहतुकीचा वाढता भार असल्याने पुरंदर इथे नवा विमानतळ स्थापन करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने दिलाय. प्रस्तावित विमानतळाचे काम जलदगती व प्राधान्यक्रमाने सुरू व्हावे यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. @rajnathsingh यांची भेट घेतली.”