विरोधकांना नमवण्यासाठी होतोय ईडीचा वापर – अधिकाराचा गैरवापर करणे चुकीचे असल्याचे शरद पवारांचे मत

विरोधकांना नमवण्यासाठीच ईडीचा वापर(Ed Action) केला जात आहे.काळ बदलेल तेव्हा सर्व दुरुस्त्या केल्या जातील, असा इशारा शरद पवार(Sharad Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिला आहे.

    पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी केंद्र सरकारवर(Central Government) टीका केली आहे. विरोधकांना नमवण्यासाठीच ईडीचा वापर(Ed Action) केला जात आहे. काळ बदलेल तेव्हा सर्व दुरुस्त्या केल्या जातील, असा इशारा शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिला आहे. अनिल देशमुखांची कायदेशीर लढाई सुरू आहे. त्यावर भाष्य करणं योग्य नाही. या देशात महाराष्ट्रात एवढ्या ईडीच्या केसेस वाचल्या का कधी ?, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, अनिल परब, प्रताप सरनाईक यांच्या विरोधात ईडीच्या कारवाया सुरू आहेत. विरोधकांना नमवण्यासाठी एक साधन म्हणून ईडीचा वापर केला जात आहे, असं पवार म्हणाले.

    सहकारी बँकेच्या व्यवहारात सरकारने किती हस्तक्षेप करावा याबाबत सूत्र ठरवले गेले पाहिजे. याबाबत राज्य सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

    शरद पवार पुढे म्हणाले की, दोन – तीन वर्षात नवीन यंत्रणा लोकांना माहीत झाली ती म्हणजे ईडी. भावना गवळी यांच्या ३-४  शिक्षण संस्था आहे, जिथं गैरव्यवहर झाला असेल तिथे त्याची तक्रार राज्य सरकारच्या गृह खात्यात करता येते. तरी ईडी येऊन चौकशी करते कशी? ही राज्याच्या अधिकारावर गदा आहे. अधिकाराचा गैरवापर होत असेल तर ते चुकीचं आहे, असेही त्यांनी सांगितले.

    निवडणुकीबाबत ते म्हणाले की,सगळ्यांना विश्वासत घेऊन निवडणूक केली पाहिजे. पण निवडणूक वर्ष दोन वर्षे पुढे ढकलनं योग्य वाटत नाही, सर्व पक्षीय एकत्र येऊन निर्णय घ्यावा.

    शरद पवार पुढे म्हणाले की, काहीही उघडायचं असेल तर सरकारची, आरोग्य विभागाची परवानगी घेतली गेली पाहिजे. जिथे नियमांची काळजी घेतली गेली असेल तिथेच परवानगी दिली जाणार आहे.