शरद पवार घेणार पुणे शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा

पुणे - कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. परंतु आता लॉकडाऊनच्या ५ व्या टप्प्यात सर्वत्र देशात अटी शिथील करण्यात आल्या आहेत. हळू हळू सर्व शहरे पुर्वपदावर येत आहेत. पुणेसह

 पुणे –  कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. परंतु आता लॉकडाऊनच्या ५ व्या टप्प्यात सर्वत्र देशात अटी शिथील करण्यात आल्या आहेत. हळू हळू सर्व शहरे पुर्वपदावर येत आहेत. पुणेसह मुंबईत कोरोनाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. पुण्यातही दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णा्ंची वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते पत्रकार परिषद घेऊन सर्व अहवाल देतील. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुण्यातील कोरोना परिस्थितीवर आढावा घेणार आहेत. आज सकाळी १० वाजता ते या दौऱ्याला सुरुवात करतील. ते पुणे शहराचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त,महापौर यांच्या उपस्थितीत आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते विधान भवनात जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. 

या बैठकीनंतर शरद पवार देवेंद्र फडणवीसांबाबत वक्तव्य करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपुर्वी आपल्या मुलाखतीत म्हटले होते की राष्ट्रवादी भाजपासोबत सत्ता स्थापन करण्यास तयार होती. असे खळबळजनक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावर अद्याप राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने आपले मत दिले नाही आहे. आज शरद पवार यावर वक्तव्य करण्याची शक्यता वर्तविले जाते. त्यामुळे शरद पवार पत्रकार परिषदेत काय बोलतील याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.