शिरूर तालुका मानवाधिकार संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी शशिकांत गावडे यांची निवड

कवठे येमाई : मानवाधिकार संरक्षण समिती,नवी दिल्ली रजिस्टर भारत सरकारच्या शिरूर तालुका अध्यक्ष पदी शशिकांत बाळू गावडे यांची नुकतीच निवड झाली आहे. त्याबाबतचे नुकतेच पत्र त्यांना प्राप्त झाल्याचे

कवठे येमाई : मानवाधिकार संरक्षण समिती,नवी दिल्ली रजिस्टर भारत सरकारच्या शिरूर तालुका अध्यक्ष पदी शशिकांत बाळू गावडे यांची नुकतीच निवड झाली आहे. त्याबाबतचे नुकतेच पत्र त्यांना प्राप्त  झाल्याचे गावडे यांनी सांगितले.

मानवाधिकार संरक्षण समिती (नवी दिल्ली ) अंतर्गत शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावाचे रहिवासी असलेले शशिकांत उर्फ सचिन बाळू गावडे सर यांची निवड समितीचे पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी गजानन भगत,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवाजीराव पाटील,महाराष्ट्र.राज्य उपाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या अनुमतीने शशिकांत गावडे यांची निवड करण्यात आली आहे.गावडे हे शिक्षकी पेशात कार्यरत असून त्यांचे सामाजिक कार्यात सातत्याने योगदान मिळत आहे. त्यांना समाजरत्न ,राज्यस्तरिय राष्ट्रभाषा प्रचारक व इतर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांच्या या निवडी बाबत माजी आमदार पोपटराव गावडे,.शिरूर पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे,सरपंच अरुण मुंजाळ,श्रीराम तरुण मंडळ,येडेबोर्हाडे वस्ती व कवठे येमाई ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.