shefali vaidya

पुण्यातील लेखिका आणि वक्त्या शेफाली वैद्य(Shefali Vaidya) यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ(Video) शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल(Viral Video On Social Media) झाला आहे.

    पुणे : पुण्यातील लेखिका आणि वक्त्या शेफाली वैद्य(Shefali Vaidya) यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ(Video) शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल(Viral Video On Social Media) झाला आहे.हा व्हिडिओ एका भारतातील रेस्टॉरंटमधील आहे. साडी नेसल्यामुळं एका महिलेला रेस्टॉरंटमध्ये(Restaurant Not Allowing Woman With Saree) प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

    व्हायरल व्हिडीओमध्ये साडी परिधान केल्यामुळं महिलेल्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकरण्यात आला. त्यावरुन महिला आणि रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. शेफाली यांनी व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं की, “हे कोणी ठरवलं की, साडी ‘स्मार्ट वेअर’ नाही ? मी युएस, युएई सोबतच युकेमधील सर्वात उत्तम रेस्टॉरंटमध्ये साडी नेसून गेले होते. तिथे मला कोणीच थांबवलं नाही. आणि हे रेस्टॉरंट भारतात एक ड्रेस कोड ठरवतंय आणि स्वतःच ठरवतंय की, साडी ‘स्मार्ट वेअर’ नाही? हे विचित्र आहे.”

    दरम्यान, शेफाली वैद्य आपल्या साड्या आणि भारतीय पारंपारिक वेशभूषा यासंदर्भातील माहिती शेअर करण्यासाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. गेल्याच महिन्यात त्यांना वस्त्र उद्योग मंत्रालयाद्वारे गठित करण्यात आलेल्या एक विशेष समितीवर सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं.