शिक्रापूरच्या सरपंचांचा राजीनामा चार महिन्यांनी मंजूर

२५ जून रोजी होणार शिक्रापूरच्या नवीन सरपंचांची निवड शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरूर) या शिरूर तालुक्यातील अतिमहत्वाच्या समजल्या जाणाऱ्या आणि सर्वात मोठ्या असणाऱ्या ग्रामपंचायतच्या सरपंच यांनी दिलेला

२५ जून रोजी होणार शिक्रापूरच्या नवीन सरपंचांची निवड

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरूर) या शिरूर तालुक्यातील अतिमहत्वाच्या समजल्या जाणाऱ्या आणि सर्वात मोठ्या असणाऱ्या ग्रामपंचायतच्या सरपंच यांनी दिलेला १६ फेब्रुवारी रोजी दिलेला राजीनामा चार महिन्यांनी मंजूर झाला असून आता २५ जून रोजी नवीन सरपंचांची निवड होणार आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) ग्रामपंचायतच्या सरपंच जयश्री दत्तात्रय भुजबळ यांनी १६ फेब्रुवारी रोजी राजीनामा दिला होता, तो राजीनामा २४ फेब्रुवारी रोजी मंजूर देखील झाला होता, परंतु त्याचवेळी एक निनावी अर्जाद्वारे दिलेला राजीनामा भुजबळ यांनी दिलेला नसल्याचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आला आणि त्याबाबत सुनावणी सुरु झाली आणि कोरोणाचा काल येऊन त्यामध्ये सरपंच पदाची घडामोड अडकली, आणि नवीन सरपंच होण्याचे स्वप्न पाहणाऱ्याचे सरपंच पदाचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. जयश्री भुजबळ यांना सुनावणी साठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बोलाविले असताना त्यांनी दिलेला राजीनामा त्यांनीच दिला असल्याचे प्रतिज्ञापत्र त्यांनी दिले, आणि त्यांनतर पुन्हा नव्याने शिक्रापूरच्या सरपंच पदासाठी निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरु झाली. उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी सदर अर्ज स्वतः निर्गती करून सरपंच पदासाठी निवडणूक घेण्याबाबतचे आदेश जाहीर केले असून त्यानुसार शिक्रापूरच्या सरपंच पदाची निवडणूक २५ जून रोजी घेण्यात येणार आहे.

– सरपंच कोण होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष

शिक्रापूर ता. शिरूर ग्रामपंचायत सदस्य संख्या सतरा असून त्यामध्ये दोन गट असून एका गटाकडे नऊ तर एका गटाकडे आठ सदस्य असून यापूर्वी अनेकदा सत्ता पालट देखील झालेले आहे, त्यामुळे आता होणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणुकीत कोणत्या गटाचा आणि कोण सरपंच होणार याकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.