कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर गाव पूर्णपणे लॉकडाऊन

शिक्रापूर : येथे दहा दिवसांपूर्वी एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असतानाच शिक्रापूर येथे राहणाऱ्या एका इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची घटना घडली.

 शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे सहा अधिकारी कर्मचारी क्वारंटाइन

शिक्रापूर : येथे दहा दिवसांपूर्वी एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असतानाच शिक्रापूर येथे राहणाऱ्या एका इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची घटना घडली. गावातील सर्वच रस्ते बंद करून गाव पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले असून प्रशासन कठोर कार्यवाही करत आहे.
                            शिक्रापूर (ता. शिरूर)  येथे दहा दिवसांपूर्वी एक कोरोना बाधित डॉक्टर आढळून आला होता. त्यावेळी सदर डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या १४४ गरोदर महिलांना आणि हॉस्पिटलच्या आठ कामगारांना होम क्वारंटाइन करण्यात आले असताना विठ्ठलवाडी येथे एक कोरोना संशयित मुलगी आढळून आणि असताना नुकताच शिक्रापूर येथे राहणाऱ्या एका इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची खळबळजनक घटना समोर आली असल्यामुळे प्रशासनाने देखील कडक पाऊले उचलली आहे. तर आता गावामध्ये येणारे सर्व रस्ते पुणे नगर रस्ता वगळता बंद करण्यात आलेले आहेत. तर ज्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण राहत होता तेथील सर्व परिसरात औषध फवारणी करण्यात आलेली असून गावामध्ये ग्रामपंचायतच्या वतीने ठिकठिकाणी जनजागृती फलक लावत गाव ३ मे पर्यंत पूर्णपणे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. तर सदर मृत व्यक्तीने १७ एप्रिल व २२ एप्रिल रोजी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेतले असल्याने शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयमधून त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेले सहा अधिकारी, कर्मचारी यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर शिक्रापूर परिसरातील एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची वार्ता नागरिकांना समजल्यामुळे आज दिवसभर नागरिकांनी घरात राहणे पसंत केले असून रस्त्यावर नागरिकांची गर्दी देखील कमी प्रमाणात दिसत होती. परंतु शिक्रापूर व परिसरात वारंवार कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे नागरिक व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
    
शिक्रापूर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याने गावामधील सर्व रस्त्यांच्या सीमा बंद केल्या असून संपूर्ण गावामध्ये औषध फवारणी करण्यात आलेली आहे, तसेच गावात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई करणार.
                      विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई – बाळासाहेब गोरे ( ग्रामविकास अधिकारी )
    
शिक्रापूर येथील सदर कोरोना बाधित मृत व्यक्ती दोन वेळा शिक्रापूर ग्रामीण रुग्नालय येथे उपचारासाठी आलेला होता तर सदर रुग्णाची तपासणी करणाऱ्या मुख्य डॉक्टर, सिस्टर यांसह सहा जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले
                                          ग्रामीण रुग्णालयचे सहा जण होम क्वारंटाइन – डॉ. वैजिनाथ काशीद.
    
शिक्रापूर येथे कोरोना बाधित मृत व्यक्ती राहत असलेल्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने सर्वे सुरु असून नागरिकांची माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी सांगितले आहे.
                   शिक्रापूर व परिसरातील सर्वे सुरु – डॉ. राजेंद्र शिंदे ( तालुका वैद्यकीय अधिकारी )
-शिक्रापूरच्या धर्तीवर तळेगाव ढमढेरे पंधरा दिवस बंद
शिक्रापूर ता. शिरूर येथे यापूर्वी कोरोना बाधित डॉक्टर आढळून आला तर नंतर विठ्ठलवाडी येथे एक रुग्ण आढळून आला व आता शिक्रापूर येथील कोरोना बाधीताचा मृत्यू झाला असल्याने शेजारील असलेल्या तळेगाव ढमढेरे गावाने चक्क ९ मे पर्यंत संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.