शिवसैनिकांनी महापालिकेतील गैरकारभाराची माहिती नागरिकांपर्यंत पोचवावी- खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी-चिंचवड महापालिकेत चुकीच्या पद्धतीने कामे चालू आहेत. ठेकेदारांचा गैरकारभार सुरु आहे. अधिकारी, सत्ताधारी ठेकेदारांना पाठिशी घालत आहेत. यातून महापालिकेची लूट चालली आहे. शिवसैनिकांनी रस्त्यावर येवून याला विरोध करावा. महापालिकेतील गैरकारभाराची शहरातील करदात्या नागरिकांना जाणीव करुन देण्याचे आवाहन, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसैनिकांना केले.

पिंपरी (Pimpari).  पिंपरी-चिंचवड महापालिकेत चुकीच्या पद्धतीने कामे चालू आहेत. ठेकेदारांचा गैरकारभार सुरु आहे. अधिकारी, सत्ताधारी ठेकेदारांना पाठिशी घालत आहेत. यातून महापालिकेची लूट चालली आहे. शिवसैनिकांनी रस्त्यावर येवून याला विरोध करावा. महापालिकेतील गैरकारभाराची शहरातील करदात्या नागरिकांना जाणीव करुन देण्याचे आवाहन, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसैनिकांना केले.

महापालिका निवडणूक ‘शिवसेना मिशन 2022′ अभियान सुरु आहे. त्याअंतर्गत शिवसेनेच्या प्रभागनिहाय बैठका सुरु आहेत. पिंपरी विधानसभेतील दापोडी विभागाची रविवारी (दि.27) बैठक झाली. यावेळी खासदार बारणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. माजी आमदार गौतम चाबुकस्वार, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख योगेश बाबर, सरिता साने, प्रतिक्षा घुले, विभागप्रमुख तुषार नवले आदी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, दापोडीचा भाग पुणे महापालिकेतून पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झाला. पण, गेल्या अनेक वर्षांपासून या भागात सुधारणा झाल्या नाहीत. या भागात अनेक समस्या आहेत. या भागातील शिवसैनिकांनी घरोघरी जावून मतदारांशी संपर्क साधावा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून करत असलेले काम जनतेपर्यंत पोहचवावे. विदायक कामाला पसंती देवून नकारात्मक गोष्टी मनातून काढून टाका. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करा अशा सूचना त्यांनी दिल्या

गाफीलपणामुळे चाबुकस्वारांचा पराभव
विधानसभेच्या 2019 मधील निवडणुकीत गाफील राहिलो. त्यामुळेच पिंपरी विधानसभा मतदारसंघात गौतम चाबुकस्वार यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी गाफील राहू नये. आत्तापासूनच जोरदार तयारी करावी. आत्मविश्वासाने आणि सक्षमपणे महापालिका निवडणुकीला तोंड द्यायचे आहे असेही खासदार बारणे म्हणाले.