Shiv Sena-NCP dispute; Sanjay Raut's direct warning to Deputy Chief Minister Ajit Pawar

राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये योग्य समन्वय आहे. वरिष्ठ नेते कुठेही गालबोट लागू देत नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांपासून खेडमध्ये राजकीय कुरघोडीच्या वारंवार घटना घडत आहे. खेडमध्ये राकाँच्या आमदाराने घाणेरडे राजकारण केले. अजितदादा, तुमच्या आमदाराला वेसण घाला, नाहीतर पुढच्या वेळी महाविकास आघाडी राहू अगर नको राहू खेडमध्ये शिवसेनेचाच आमदार असेल, असे राऊत म्हणाले. राऊत यांनी शुक्रवारी खेडमध्ये राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पत्रपरिषदेत खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांवर टीका केली.

  खेड : आगामी काळात होऊ घातलेल्या खेड पंचायत समितीतील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थानिक पातळीवर कुरघोडीचे प्रयत्न सुरू असल्याने शिवसेना नेते व खासदार संजय राऊत या प्रकारावरुन संतापलेले दिसत आहे. त्यामुळे त्यांनी थेट राकाँचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच गर्भित इशारा दिला आहे.

  राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये योग्य समन्वय आहे. वरिष्ठ नेते कुठेही गालबोट लागू देत नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांपासून खेडमध्ये राजकीय कुरघोडीच्या वारंवार घटना घडत आहे. खेडमध्ये राकाँच्या आमदाराने घाणेरडे राजकारण केले. अजितदादा, तुमच्या आमदाराला वेसण घाला, नाहीतर पुढच्या वेळी महाविकास आघाडी राहू अगर नको राहू खेडमध्ये शिवसेनेचाच आमदार असेल, असे राऊत म्हणाले. राऊत यांनी शुक्रवारी खेडमध्ये राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पत्रपरिषदेत खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांवर टीका केली.

  आम्हीही तोडफोड करू शकतो

  खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने घाणेरडे राजकारण केले. शरद पवारांच्या पक्षात राजकारण करण्यासाठी ते लायकीचे नाही. पंचायत समितीच्या जागेवरून आमदार राजकारण करत आहेत, ते परंपरेला धरून नाही. अजितदादांना सांगून सुद्धा हे रेटून नेत असतील तर ह्याला माज आला असे म्हणतात. आम्ही देखील फोडाफोडी करू शकतो. खेडच्या आमदाराची वागण्याची पद्धत हीच राहिली तर नाहीतर पुढच्या वेळी महाविकास आघाडी असेल किंवा नसेल खेडमध्ये शिवसेनेचाच आमदार असेल असे  संजय राऊत म्हणाले.

  खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव अकरा विरुध्द तीन अशा मतांनी मंजूर झाला .२४ मे ला सभापतीविरूध्द शिवसेनेच्या सहा सदस्यांनी बंड पुकारून हा अविश्वास ठराव दाखल केला होता. त्याला राष्ट्रवादी व भाजप सदस्यांनी साथ दिली. त्या सदस्यांच्या बंडखोरीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची फूस असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी खेडमध्ये मोहिते पाटलांवर टीकास्त्र सोडले आहे.

  ‘स्वबळ’ सिद्ध करा, आमचा पाठिंबा

  राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवेल अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले, काँग्रेसने जर स्वबळावर लढून त्यांना देशातमध्ये स्वतःची सत्ता आणायची असेल तर त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. जर नाना पटोले किंवा अन्य कुणी जर काँग्रेस स्वबळावर लढून लोकसभेत 285 चे बहुमत आणून सत्ता आणणार असतील तर नक्कीच आम्ही त्यांना पाठिंबा देऊ अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.