पिंपरीत ‘शिवभोजन थाळी’  मिळणार १४ मेपर्यंत मोफत; थाळींची संख्या ५० टक्क्यांनी वाढविली

शहरातील ११ केंद्रावर सकाळी ७ ते ११ या वेळेत १४ मे पर्यंत पार्सल स्वरुपात थाळी मोफत मिळेल.तसेच, सरकारने थाळींची संख्या ५० टक्क्यांनी वाढविली आहे. यापूर्वी १०० थाळी दिल्या जाणाऱ्या केंद्रावर ११३ थाळी देण्यास सुरुवात झाली आहे. मोफत थाळी मिळत असल्याने मागणी वाढली असून केंद्रावर गर्दी वाढू लागली आहे.

    पिंपरी: कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शिवभोजन थाळीच्या वेळेत राज्य सरकारने बदल केला आहे. शहरातील ११ केंद्रावर सकाळी ७ ते ११ या वेळेत १४ मे पर्यंत पार्सल स्वरुपात थाळी मोफत मिळेल.तसेच, सरकारने थाळींची संख्या ५० टक्क्यांनी वाढविली आहे. त्यानुसार, यापूर्वी १०० थाळी दिल्या जाणाऱ्या केंद्रावर ११३ थाळी देण्यास सुरुवात झाली आहे. मोफत थाळी मिळत असल्याने मागणी वाढली असून केंद्रावर गर्दी वाढू लागली आहे.
    शहरात वायसीएम रुग्णालय, वल्लभनगर एसटी आगार, महापालिका इमारतीमधील केंद्र, जी ब्लॉक चिंचवड औद्योगिक वसाहतीमधील केंद्र, पीएमआरडीए आकुर्डी रेल्वे स्टेशन, जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालय (औंध), प्रतिक हॉटेल (देहूरोड), सुनेत्रा महिला बचतगट व्यापारी संकुल (चिंचवड), श्रीपाद फूड सर्व्हिसेस (सांगवी), श्रीसंत तुकाराम महाराज संस्था (देहूगाव), स्वयंमहिला बहुउद्देशीय संस्था (भोसरी) या ठिकाणी शहरात मोफत शिवभोजन थाळी उपलब्ध आहे.