सणसरमध्ये शिवशाही बसची बैलगाडीला धडक ; दोन बैलांचा जागीच मृत्यू

रोडचे काम पूर्ण झाल्यामुळे वाहनांचा वाढता वेग अपघाताला कारणीभूत ठरत आहे. येथील साइड पट्टयाचे काम पूर्ण न झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रहदारीच्या भागात गतिरोधक बसविण्याची देखील गरज आहे.परिसरात साखर कारखाना असल्याने ट्रॅक्टर, बैलगाडी याची मोठी वर्दळ असते, यामुळे अपघात घडत आहेत. यामुळे रोडचे कामे पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहेत.

    सणसर : भवानीनगर- सणसर परिसरात गेल्या दोन- तीन दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरूच आहे. काल गुरुवारी ( दि १८ ) पहाटे भवानीनगर येथे परेल-अकलूज शिवशाही बसने ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या बैलगाडीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये बैलगाडीला जुंपलेल्या दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला, तर एक ऊसतोडणी कामगार गंभीर जखमी झाला आहे.

    यामुळे परिसरात गतिरोधक करण्याची तसेच साइड पट्टी भरण्याची मागणी केली जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून चार जणांचा या रोडवर मृत्यू झाला आहे. आजच्या भीषण अपघातानंतर स्थानिकांनी आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर भवानीनगर पोलीस तातडीने या ठिकाणी पोहचले. मृत बैलांना जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करण्यात आले.