शिवशाही एसटी बसला कळंब येथे अपघात

बसमधील आठ प्रवासी किरकोळ जखमी
मंचर : आंबेगाव तालुक्यातील कळंब येथे पुणे-नाशिक रस्त्यावर शिवशाही एसटी बस पलटी होवुन रविवार(दि.२३) रोजी रात्री अपघात झाला आहे. समोरुन येणारी चारचाकी गाडी अचानक शिवशाही एसटी बससमोर आल्याने अपघात झाला.एसटी बसमधील आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळंब येथे पुणे-नाशिक रस्त्यावर हॉटेल तिरंगा जवळ असणाऱ्या वळणावर शिवशाही बस क्रमांक एमएच ०६ बी डब्ल्यु ०६४१ हि बस पुण्याच्या दिशेने जात होती.त्यावेळी पुणे बाजुकडुन येणारी चारचाकी अचानक एसटी बसच्या समोर आल्याने चालकाने एसटी बस डाव्या बाजुला घेतल्याने एसटी बस रस्त्याच्या खाली उतरुन पलटी झाली. एसटी बसमधील आठ प्रवासी जखमी झाले असुन त्यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत एसटी बस चालक मनोहर देवराम आहेर (वय ५८) राहणार सय्यद िंपंपरी (ता.नाशिक) यांनी मंचर पोलिस ठाण्यात अपघाताबाबत फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजु कांबळे करत आहे.