धक्कादायक ! पुरंदर तालुक्यातील २५ शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग ; विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्याची मागणी

शिक्षकांना कोरोनाची लागण नेमकी कशी झाली याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहे. कारण अनेकदा शिक्षक आपली योग्य ती काळजी घेत असतात. मात्र विद्यार्थ्यांच्या संपर्कांत आल्याने संसर्ग झाल्याची निष्कर्ष काढला जात आहे.

सासवड: साधारण ४ जानेवारीपासून ९ ते १२ चे वर्ग सुरू करण्यासाठी सरकार विचाराधीन असताना दुसरीकडे मात्र कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण थांबत नसल्याचे दिसून आले आहे. पुरंदर तालुक्यातील २५  शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ निर्माण झाली आहे, संबंधित
शिक्षकांच्या तपासणीचा अहवा नुक्ताच प्राप्त झाला आहे. या घटनेमुळे पुरंदर तालुका शिक्षक संघटनेने तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांचीही कोरोना चाचणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. मात्र शिक्षकांना कोरोनाची लागण नेमकी कशी झाली याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहे. कारण अनेकदा शिक्षक आपली योग्य ती काळजी घेत असतात.   विद्यार्थ्यांच्या संपर्कांत आल्याने संसर्ग झाल्याची निष्कर्ष काढला जात आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचीही कोरोना चाचणी करून घ्यावी ही मागणी शिक्षक संघटनेकडून केली जात आहे.