crime

पुणे : कंपनीत कामाला जाऊ नये या कारणावरुन झालेल्या वादात एकाने मित्राच्या गळ्यावर, पोटावर, बेंबीजवळ चाकूने वार करुन जबर जखमी केले. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अशोक काळुराम ताठे (वय ५०, रा. खांदवेनगर, लोहगांव) याला अटक केली आहे.याबाबत गणेश चौधरी (वय ३२, रा. खांदवेनगर, लोहगांव) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

चौधरी आणि ताठे हे दोघे एकमेकांचे परिचयाचे असून मित्र आहेत. अशोक ताठे हा एका कंपनीत कामाला आहे. चौधरी हा कागदी पुष्ठे गोळा करुन त्या कंपनीत जमा करण्याचे काम करतात. शनिवारी सायंकाळी खांदवेनगर येथील मिलटरी टॉवरजवळ चौधरी उभे असताना ताठे दारु पिऊन तेथे आला. मी जेथे काम करतो, त्या कंपनीमध्ये असलेले पुष्ठे गोळा करण्यास जाऊ नको, असे ताठे चौधरीला म्हणाला.

त्यावर चौधरी याने कंपनी काय तुझ्या बापाची आहे का असे म्हटले. त्यावर चिडून ताठे याने खिशातून बटन चाकू काढून चौधरी याच्या गळ्यावर, पोटावर, बेंबीजवळ, उजव्या हाताच्या बोटावर वार करुन जबर जखमी केले. विमानतळ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक लहाने अधिक तपास करीत आहेत.