धक्कादायक! पत्नीवर पाळत ठेवण्यासाठी बेडरुममध्ये लावला कॅमेरा

३४ वर्षीय पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन बेडरूमध्ये कॅमेरा लावला. पती नोकरीसाठी बाहेरगावी असल्याने याचा गैरफायदा घेऊन नणंदेच्या पतीने विवाहितेवर बळजबरी करून बलात्कार केला. तसेच सासरच्यांनी फ्लॅट घेण्यासाठी २५ लाखांची मागणी करून शारीरिक, मानसिक छळ केला. याशिवाय बलात्काराच्या प्रकारानंतर पती आणि नंदाव्याने विवाहितेचा गर्भपात केला. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

    पिंपरी : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर पाळत ठेवण्यासाठी पतीने चक्क घरातील बेडरुममध्ये कॅमेरा लावल्याचा धक्कादायक प्रकार चिंचवड येथे उघडकीस आला आहे. तसेच विवाहितेसोबत नंदावाच बळजबरीने शारीरिक संबंध ठेवत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी पतीला कॅमेरा लावल्याप्रकरणी आणि नंदाव्याला बलात्कार प्रकरणी अटक केली आहे.

    २८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ३४ वर्षीय पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन बेडरूमध्ये कॅमेरा लावला. पती नोकरीसाठी बाहेरगावी असल्याने याचा गैरफायदा घेऊन नणंदेच्या पतीने विवाहितेवर बळजबरी करून बलात्कार केला. तसेच सासरच्यांनी फ्लॅट घेण्यासाठी २५ लाखांची मागणी करून शारीरिक, मानसिक छळ केला. याशिवाय बलात्काराच्या प्रकारानंतर पती आणि नंदाव्याने विवाहितेचा गर्भपात केला. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.