धक्कादायक !उरुळीतील  महिलेच्या कोरोना चाचणीचे परस्परविरोधी अहवाल

लोणी काळभोर : उरुळी कांचन येथील राजकीय महीलेचे दोन प्रयोगशाळेतील कोरोना चाचणी तपासणी अहवाल परस्परविरोधी आल्याने संबंधित महीला पदाधिकारी पॉझिटीव्ह का निगेटिव्ह अशा संभ्रम निर्माण झाला आहे. या

लोणी काळभोर : उरुळी कांचन येथील राजकीय महीलेचे दोन प्रयोगशाळेतील कोरोना चाचणी तपासणी अहवाल परस्परविरोधी आल्याने संबंधित महीला पदाधिकारी पॉझिटीव्ह का निगेटिव्ह अशा संभ्रम निर्माण झाला आहे. या तपासणीसाठी संबधित महिलेचा स्वॅब (घशातील द्राव) पुणे शहरातील दोन वेगवेगळ्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.

उरुळी कांचन येथील एका राजकीय महिला पदाधिकाऱ्यास कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवू लागल्याने लोणी काळभोर येथील  खासगी रुग्णालय प्रशासनाने संबधित महिलेचा स्वॅब तपासनीसाठी सोमवारी (ता. ८) रात्री उशिरा हडपसर व पुणे येथील दोन वेगवेगळ्या प्रयोगशाळेत पाठवला होता. या दोन्ही प्रयोगशाळेपैकी पुणे येथील प्रयोगशाळेने संबधित महिला पॉझिटिव्ह, तर हडपसर येथील प्रयोगशाळेने महिला कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल दिला आहे. एकाच महिलेचा अहवाल वेगवेगळा मिळाल्याने नेमक्या कोणत्या प्रयोगशाळेचा अहवाल ग्राह्य धरावयाचा, हा मोठा प्रश्न रुग्णालय व्यवस्थापनापुढे निर्माण झाला आहे. तसेच, दोन्ही प्रयोगशाळांनी आपलाच अहवाल बिनचूक असल्याचा दावा केला आहे.  
 
याबाबत हॉस्पीटलचे व्यवस्थापक  यांनी सांगितले की, सरकारने या दोन्ही प्रयोगशाळांना स्वॅब तपासणीची अधिकृत परवानगी दिलेली आहे. पुणे येथील प्रयोगशाळेचे टायअप महानगरपालिकेशी आहे, तर हडपसर येथील प्रयोगशाळेचे टायअप शासनाशी आहे. त्यामुळेच आमच्या रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी दोन्ही प्रयोगशाळेत पाठवत आहोत. उरुळी कांचन येथील महिला रुग्णाच्या स्वॅबचा अहवाल परस्परविरोधी आला आहे.  (गुरुवारी) पुन्हा एकदा संबधित महिलेचे स्वॅब शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच पुढील दिशा ठरवली जाणार आहे. 
  दरम्यान, या महिलेच्या संपर्कात आलेले तिचे तीन मुलगे व इतर अकरा जण, अशा चौदा जणांचे कोरोना अहवालही बुधवारी उशिरा निगेटिव्ह आले आहेत.