You too will be disgusted to see the filthy glory of this Panipuriwala

घटनेच्या दोन दिवसा आधी गहिनीनाथने ऑफिसवरून घरी जाताना पाणीपुरी पार्सल नेली होती. त्यावेळी पत्नी प्रतिक्षा हिने मला न विचारता पाणीपुरी का आणली यावरून वाद घातला. त्यांच्यात वाद झाला. दोन दिवस यासह वेगवेगळ्या कारणावरून त्यांच्यात वाद होत होता. रागाच्या भरात शनिवारी प्रतिक्षा यांनी विषारी औषध प्राशन केले, अशी माहिती सुत्रांनी दिली.

    पुणे : पुण्यात नव दांम्पत्यात पाणीपुरी न विचारता आणल्यावरून वाद झाल्यानंतर रागाच्या भरात विषारी औषध पिऊन पत्नीने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पोलीसांनी पतीला अटक केली आहे. प्रतिक्षा गहिनीनाथ सरवदे (वय २३, रा. आंबेगाव पठार, मुळ. बीड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती गहिनीनाथ सरवदे (वय ३३) याला पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत प्रकाश भिसे (वय ५५) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गहिनीनाथ हा मुळचा सोलापूर जिल्ह्यातील आहे. त्यांचा २०१९ मध्ये विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आहे. दरम्यान, गहिनीनाथ हा उच्चशिक्षीत असून, तो एका मोठ्या कंपनीत नोकरी करतो. पत्नी गावी राहत होती. तर, गहिनीनाथ हा नोकरीनिमित्त पुण्यात राहत होता. त्यावरून त्यांच्यात वाद होत असत. दरम्यान काही दिवसांपुर्वी त्याने पत्नीला पुण्यात आणले होते. दोघेही आंबेगाव पठार येथे राहत होते.

    घटनेच्या दोन दिवसा आधी गहिनीनाथने ऑफिसवरून घरी जाताना पाणीपुरी पार्सल नेली होती. त्यावेळी पत्नी प्रतिक्षा हिने मला न विचारता पाणीपुरी का आणली यावरून वाद घातला. त्यांच्यात वाद झाला. दोन दिवस यासह वेगवेगळ्या कारणावरून त्यांच्यात वाद होत होता. रागाच्या भरात शनिवारी प्रतिक्षा यांनी विषारी औषध प्राशन केले, अशी माहिती सुत्रांनी दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर खासगी रुग्णलायत उपचार सुरू होते. रविवारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सचिन धामणे हे करत आहेत.