धक्कदायक! ‘गुगल’वर मोबाइल क्रमांक शोधून एटीएम कार्डची माहिती घेतली अन नंतर मारला बँक खात्यावर डल्ला

वानवडी येथील ४७ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेने कॅम्प परिसरातील एटीएममधून १० हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रक्कम निघाली नाही. त्यामुळे त्या घरी गेल्या. व्यवहार पूर्ण करूनही कोणताही मेसेज न आल्याने त्यांनी 'गुगल'वरून बँकेच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीचा संपर्क क्रमांक शोधला.

    पुणे : पैसे काढल्याचा मेसेज न आल्यामुळे ‘गुगल’वर मोबाइल क्रमांक शोधून फोन केल्यानंतर सायबर चोरट्यांनी एटीएम कार्डची सर्व माहिती विचारून ६३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात ‘आयटी अॅक्ट’नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    वानवडी येथील ४७ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेने कॅम्प परिसरातील एटीएममधून १० हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रक्कम निघाली नाही. त्यामुळे त्या घरी गेल्या. व्यवहार पूर्ण करूनही कोणताही मेसेज न आल्याने त्यांनी ‘गुगल’वरून बँकेच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीचा संपर्क क्रमांक शोधला. त्या क्रमांकावर विचारणा केली असता, संबंधित व्यक्तीने सर्व माहिती देतो, असे सांगत एटीएम कार्डची सर्व गोपनीय माहिती विचारून घेतली. या माहितीच्या आधारे तक्रारदारांच्या बँक खात्यामधून ६३ हजार ८१० रुपये ऑनलाइनद्वारे काढून घेतले. या प्रकारानंतर खात्यातून रक्कम पैसे कमी झाल्याचा मेसेज आल्यानंतर संबंधित महिलेने तत्काळ पोलिसांकडे जाऊन तक्रार केली. वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.