धक्कादायक! कामावरून काढल्याने मोबाईलवर अश्लिल फोटो पाठविला

फिर्यादीच्या वडिलांनी आरोपीला कामावरून काढून टाकले. त्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीच्या वडिलांना शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीला फोन करून शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी महिलेला व्हाटस अपवरून अश्लील फोटो आणि अश्लील लिंक पाठवून विनयभंग केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने तपास करीत आहेत.

    पिंपरी : कामावरून काढून टाकल्याच्या रागातून तरुणाने महिलेला व्हाटस अपवरून अश्लील फोटो आणि अश्लील लिंक पाठवली. हा प्रकार १५ एप्रिल रोजी रात्री पावणेनउच्या सुमारास घडला.पीडित ३१ वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत सदाशिव सोनटक्के (रा. नमस्कारी, ता. तिवासा, जि. अमरावती) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.