धक्कादायक! साऊंड सिस्टिमचा आवाज मोठा करुन व्यत्यय आणल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन चौघांचा तरुणावर कोयत्याने वार

फिर्यादी व आरोपी एकाच वसाहतीत राहतात. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने अडसुळ यांच्या मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरु होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या घरातील टीव्ही व साऊंड सिस्टिमचा आवाज मोठ्या प्रमाणावर वाढवत होते. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात व्यत्यय येत होता. त्याचा फिर्यादी यांनी जाब विचारल्याने ६ महिन्यांपूर्वी त्यांच्यात भांडणे झाली होती.

    पुणे : मुलांचे ऑनलाइृन शिक्षण सुरु असताना साऊंड सिस्टिमचा आवाज मोठा करुन व्यत्यय आणल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन चौघांनी शेजारी राहणारा तरुणावर कोयत्याने वार करुन त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे.याप्रकरणी महादेव अडसुळ (वय ३६, रा. शांतीनगर वसाहत, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी विकास पांडव (वय ३५), दत्ता पांडव (वय ३०), ओंकार पांडव (वय १९) आणि आकाश पवार (वय २५, सर्व रा. शांतीनगर वसाहत, धनकवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शांतीनगर वसाहतीत रविवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडला.

    फिर्यादी व आरोपी एकाच वसाहतीत राहतात. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने अडसुळ यांच्या मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरु होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या घरातील टीव्ही व साऊंड सिस्टिमचा आवाज मोठ्या प्रमाणावर वाढवत होते. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात व्यत्यय येत होता. त्याचा फिर्यादी यांनी जाब विचारल्याने ६ महिन्यांपूर्वी त्यांच्यात भांडणे झाली होती. त्यावेळी भांडणे मिटविण्यात आली होती. तरी त्याचा राग मनात भरुन आरोपींनी रविवारी रात्री अडसुळ यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. कोयत्याने त्यांच्या डोक्यावर, हातावर वार करुन गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्याबरोबरच पत्नी, मावशी, मावस भाऊ यांनाही मारहाण करुन जखमी केले. पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.