धक्कादायक! मैत्रिणीच्या मुलीनेच चोरले ६ लाख

तक्रारदार या कामानिमित्त दुपारी बाहेर गेल्या होत्या. त्यादरम्यान या मैत्रिणीच्या मुलीने कपाटातून सोन्याचे दागिने व रोकड असा ५ लाख ९० हजारांचा ऐवज चोरून नेला. त्या परत आल्यानंतर त्यांन हा प्रकार दिसून आला. त्यांनी पोलीसांकडे तक्रार दिली. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत

    पुणे : घरी राहणाऱ्या मैत्रिणीच्या मुलीनेच कपाटामधून ६ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. येरवडा परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी ५० वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार यांच्या घरी त्यांच्या मैत्रिणीची मुलगी राहते. तिच्याकडे घराची एक चावी असत.

    दरम्यान, तक्रारदार या कामानिमित्त दुपारी बाहेर गेल्या होत्या. त्यादरम्यान या मैत्रिणीच्या मुलीने कपाटातून सोन्याचे दागिने व रोकड असा ५ लाख ९० हजारांचा ऐवज चोरून नेला. त्या परत आल्यानंतर त्यांन हा प्रकार दिसून आला. त्यांनी पोलीसांकडे तक्रार दिली. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत