धक्कादायक! गट शिक्षणअधिकाऱ्याला ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक

आरटीई मार्फत प्रवेश प्रकरणात लाच मागण्यात आली होती. तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार आज सापळा रचला. तसेच जिल्हा परिषदेच्या कार्यलयातच ५० हजार रुपयांची लाच घेताना या दोघांना पकडण्यात आले आहे.

    पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या गट शिक्षण अधिकारी आणि खासगी व्यक्तीला ५० हजार रुपयांची लाच घेताना पुणे एसीबीने पकडले आहे. या कारवाईने मोठी खळबळ उडाली असून, कारवाई कार्यलयात झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे.रामदास वालझडे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी कारवाई सुरू असल्याचे एसीबीने सांगितले आहे.

    एसीबीच्या माहितीनुसार, आरटीई मार्फत प्रवेश प्रकरणात ही लाच मागण्यात आली होती. तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार त्याची पडताळणी करण्यात आली. आज सापळा रचला. तसेच जिल्हा परिषदेच्या कार्यलयातच ५० हजार रुपयांची लाच घेताना दोघांना पकडण्यात आले आहे. ही कारवाई झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता.