धक्कादायक! ‘या’ कारणामुळे केला महिला वाहतूक पोलीसचा विनयभंग

एका दुचाकीवरून तिघेजण आले. त्यातील एकजण काही अंतरावर उतरला. हा प्रकार संबंधित महिला पोलिसांच्या लक्षात आला. त्यामुळे महिला पोलिसाने दुचाकीस्वार अन्सारी याला ट्रिपलसीट आल्याबाबत वाहतूक दंडाची पावती करण्यास सांगितले. त्यावरून अन्सारी याने ‘शरम करो तुम लोग. कितना झूट बोलते हो’ असे म्हणत अपशब्द वापरून वाहतूक पोलीस महिलेचा विनयभंग केला.

    पिंपरी: ट्रिपलसीट असलेल्या एका दुचाकीस्वाराला दंडाची पावती करण्यास सांगितले. त्यावरून दुचाकीस्वाराने वाहतूक पोलीस महिलेला अश्लील भाषेत बोलून त्यांचा विनयभंग केला. तसेच पोलीस करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा प्रकार फुगेवाडी चौक, दापोडी येथे घडला आहे. याप्रकरणी दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    आब्दुल सलाम अईनुल हक अन्सारी (वय ४८, रा. सुदर्शननगर, पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वाराने नाव आहे. याबाबत वाहतूक पोलीस महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाहतूक पोलीस महिला शनिवारी दापोडी येथील फुगेवाडी चौकात वाहतूक नियमन करत होत्या. त्यावेळी एका दुचाकी (एम एच १२/ ई वाय ५१६८) वरून तिघेजण आले. त्यातील एकजण काही अंतरावर उतरला. हा प्रकार संबंधित महिला पोलिसांच्या लक्षात आला.

    त्यामुळे महिला  पोलिसाने दुचाकीस्वार अन्सारी याला ट्रिपलसीट आल्याबाबत वाहतूक दंडाची पावती करण्यास सांगितले. त्यावरून अन्सारी याने ‘शरम करो तुम लोग. कितना झूट बोलते हो’ असे म्हणत अपशब्द वापरून वाहतूक पोलीस महिलेचा विनयभंग केला. तसेच फिर्यादी करत असलेल्या सरकारी कामात अन्सारी याने अडथळा निर्माण केला. अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत.