धक्कादायक ! पत्नीला ‘इम्प्रेस’ करण्यासाठी त्याने पोलीस अधिकारी असल्याचे भासवले, एकाला अटक

पुणे  : पत्नीला 'इम्प्रेस' करण्यासाठी एका पतीने स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासविले. मात्र पोलिसांच्या कचाट्यात सापडल्यावर त्याने गुन्हा मान्य केला. घडले असे की लॉकडाऊनमध्ये भाऊसाहेब महादेव गोयकर (वय -२५, रा. गुरव पिंपरी, थीटेवाडी, नगर) या आरोपीने स्वतःच्या पत्नीला खुश करण्यासाठी युनिफॉर्म घालून पोलीस अधिकारी झाल्याचे सांगितले.

पुणे  : पत्नीला ‘इम्प्रेस’ करण्यासाठी एका पतीने स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासविले. मात्र पोलिसांच्या कचाट्यात सापडल्यावर त्याने गुन्हा मान्य केला. घडले असे की लॉकडाऊनमध्ये भाऊसाहेब महादेव गोयकर (वय -२५, रा. गुरव पिंपरी, थीटेवाडी, नगर) या आरोपीने स्वतःच्या पत्नीला खुश करण्यासाठी युनिफॉर्म घालून पोलीस अधिकारी झाल्याचे सांगितले. मात्र त्याचा हा खोटेपणा पोलिसांच्या लगेचच लक्षात आला. वानवडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना पोलिसांच्या गणवेशातील एक संशयास्पद व्यक्ती दिसला. त्याच्या खांद्यावर ‘मपो’ ऐवजी मपोसे असे लावले होते. त्यामुळे पोलिसांना संशय निर्माण झाला. पोलिसांनी त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली असता त्याच्याकडे नव्हते. त्यामुळे पोलिसांनी भाऊसाहेबकडे अधिक चौकशी केली असता त्याने पोलीस नसल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलीसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. अधिक चौकशीत त्याने सांगितले की लॉकडाऊनमध्ये आपण पोलिसात भरती झाले आहोत असे खोटे पत्नीला सांगितले होते. त्यामुळे पत्नीला खरे वाटावे म्हणून तो युनिफॉर्म घालून रामटेकडी येथे पत्नीसोबत बँकिंगच्या परीक्षेसाठी आला असल्याचे सांगितले.