Video : धक्कादायक! पुण्यात बिर्याणीवरून हॉटेल चालकाला टोळक्याची बेदम मारहाण

सिंहगड रोड पोलीस ठाण्यात हॉटेल व्यवसायिक मयूर मते (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून टोळक्यावर गुन्हा दाखल केला आहे. व्यवसायिक मते यांच्यासह कामगार इसराफील व अश्फाक हे जखमी झाले आहेत.

    पुणे : पुण्यात बिर्याणीवरून हॉटेल चालकाला टोळक्याने बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सिंहगड रोडमधील धायरीत भरदिवसा ही घटना घडली. या सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यामुळे पुण्यातील गुन्हेगारी किती विकोपाला गेली आहे, त्याच आणखी एक उदाहरण दिसत आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे.

    पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात हॉटेल व्यवसायिक मयूर मते (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून टोळक्यावर गुन्हा दाखल केला आहे. व्यवसायिक मते यांच्यासह कामगार इसराफील व अश्फाक हे जखमी झाले आहेत. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.