रस्त्याने जाताना अचानक म्हैस बिथरली अन दुचाकीस्वारासोबत घडली Shocking  घटना 

म्हैस अचानक बिथरली व तिने समोरून आलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. अचानक घडलेल्या घटनेमुळे सर्वांची धावपळ उडालेली दिसून आली. या घटनेचा थरारक व्हिडीओ सीसीटीव्हीचीकॅमेऱ्यात कैद झाला आहे

    पुण्यातील लष्कर परिसरातील वरशी मस्जिद जवळ दुचाकीवरून जाणाऱ्या जोडप्याला बिथरलेल्या म्हशीने धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत पती-पत्नी जखमी झाले आहेत.
    म्हशीच्या कळपातील एक म्हैस अचानक बिथरली व तिने समोरून आलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. अचानक घडलेल्या घटनेमुळे सर्वांची धावपळ उडालेली दिसून आली. या घटनेचा थरारक व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी म्हशीच्या मालकाविरोधात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.