मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना एकच जमीन दोघांना विकून फसवणूक

आरोपी गायकवाड याने फिर्यादी बबु आणि त्यांच्या पत्नी वेलेरी यांना विकली. त्याबाबत दुय्यम निबंधक कार्यालय वडगाव - मावळ येथे दस्तऐवज केला. तसेच त्या जमिनीची सातबारा रजिस्टरला नोंद करण्यासाठी आणखी तीन हजार रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी बबु यांना विकलेली १० गुंठे आणि उर्वरित १४२ गुंठे अशी एकूण १५२ गुंठे जमीन आरोपी गायकवाड याने शांताबाई मोहनराव काकडे यांना विकली.

    पिंपरी: एकच जमीन दोघांना विकून फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मावळ तालुक्यातील आंबळे येथे घडला.

    बबु कुटी कुरयिन (वय ६७, रा. स्पायसर कॉलेज रोड, औंध) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विजय किसन गायकवाड (रा. वानवडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २९ डिसेंबर २०१७ रोजी घडला.

    मावळ तालुक्यातील आंबळे येथे आरोपी विजय गायकवाड याची १५२ गुंठे जमीन आहे. त्यातील दहा गुंठे जागा आरोपी गायकवाड याने फिर्यादी बबु आणि त्यांच्या पत्नी वेलेरी यांना विकली. त्याबाबत दुय्यम निबंधक कार्यालय वडगाव – मावळ येथे दस्तऐवज केला. तसेच त्या जमिनीची सातबारा रजिस्टरला नोंद करण्यासाठी आणखी तीन हजार रुपये घेतले. मात्र, सातबारा रजिस्टरला संबंधित जमिनीची नोंद केली नाही. त्यानंतर फिर्यादी बबु यांना विकलेली १० गुंठे आणि उर्वरित १४२ गुंठे अशी एकूण १५२ गुंठे जमीन आरोपी गायकवाड याने शांताबाई मोहनराव काकडे यांना विकली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.