धक्कादायक!!! डोक्यात वार करून मजूर महिलेचा खून

वेळ होऊनही महिला कामावरून घरी आली नसल्याने पतीने जाऊन पाहणी केली. त्यावेळी महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच देहूरोड आणि रावेत पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

    पिंपरी: धारदार शस्त्राने डोक्यात वार करून मजूर महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना किवळे येथे उघडकीस आपली आहे. सौदव सोमेरू उरव (वय ४०, सध्या रा. किवळे, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला तिच्या पतीसह किवळे येथे राहत होती. तिचा भाचा देखील त्यांच्यासोबत राहत होता.

    घटनेदिवशी सकाळी पती आणि भाचा नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. त्यानंतर महिला देखील जवळच असलेल्या बांधकाम साईटवर कामाला गेली. सायंकाळी पती कामावरून घरी आला. वेळ होऊनही महिला कामावरून घरी आली नसल्याने पतीने जाऊन पाहणी केली. त्यावेळी महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच देहूरोड आणि रावेत पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रावेत पोलीस तपास करीत आहेत.