धक्कादायक! बुधवार पेठेतल्या तरूणीचा प्रेमप्रकरणातून खून; शरिराचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले अन दोन सुटकेस लवासाला फेकून दिल्या

हनुमंत शिंदे हा फरासखाना परिसरात राहण्यास आहे. तर मयत मुलगी ही बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करायची. दरम्यान, या दोघांचे प्रेम प्रकरण होते. हनुमंत हा तरूणीला घेऊन स्वतंत्र राहत होता. पण, हनुमंत याचा विवाह झालेला होता. त्यामुळे तो घरी देखील जात असे. ही बाब या तरूणीला खटकत होती.

    पुणे : बुधवार पेठेतील प्रियसीच्या त्रासाला कंटाळून खूनकेल्यानंतर तिचे शरिराचे तुकडे केल्याचा खळबळजनक प्रकार पुण्यात घडला आहे. दोन सुटकेसमध्ये केलेले तुकडेभरून या सुटकेस लवासा येथे टाकून देण्यात आल्या असल्याचा धक्कादायक प्रकार पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे.
    हनुमंत शिंदे असे या आरोपीचे नाव आहे. त्याला पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत शिंदे हा फरासखाना परिसरात राहण्यास आहे. तर मयत मुलगी ही बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करायची. दरम्यान, या दोघांचे प्रेम प्रकरण होते. हनुमंत हा तरूणीला घेऊन स्वतंत्र राहत होता. पण, हनुमंत याचा विवाह झालेला होता. त्यामुळे तो घरी देखील जात असे. ही बाब या तरूणीला खटकत होती. ती हनुमंतला घरी जात जाऊ नको, माझ्यासोबतच रहा अशी म्हणत होती. त्यातून ती त्याला सतत टॉर्चर करत असे. या त्रासाला कंटाळून हनुमंत याने १२ ऑगस्ट रोजी तिचा गळादाबून खून केला. त्यानंतर तिच्या शरिराचे तुकटे-तुकडे केले. ते तुकडे सुटकेसमध्ये भरले व ते लवासा परिसरात निर्जनस्थळी नेहून टाकले. त्यानंतर तो बिंदास परिसरात राहत होता. पण, ही कुनकून पोलीसांना लागली आणि या खूनाचा वाचा फुटली आहे. पोलीसांनी लवासा येथे धाव घेतली असून, एक सुटकेस पोलीसांना सापडली आहे. पण, दुसरी अद्याप मिळालेली नाही. तिचा शोध घेतला जात आहे.