धक्कदायक! ‘सॉरी मॉम’ असे म्हणत पोलीस शिपायाने केली आत्महत्या

रज्जाक हा इंदापूर तालुक्यातील मणेरी येथील रहिवाशी होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तो पुण्याच्या भोर तालुक्यातील राजगड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होता. रज्जाकचे नातेवाईक गेल्या दोन दिवसांपासून त्याला काही कामानिमित्त फोन करत होते.

    पुणे : ग्रामीण पोलीस दलात भोर राजगड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका शिपायाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रज्जाक मोहम्मद मणेरी असं या पोलीस शिपायाचे नाव आहे. रज्जाक यांच्या मृतदेहाजवळ ‘सॉरी मॉम’ असे लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, रज्जाक हा इंदापूर तालुक्यातील मणेरी येथील रहिवाशी होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तो पुण्याच्या भोर तालुक्यातील राजगड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होता. रज्जाकचे नातेवाईक गेल्या दोन दिवसांपासून त्याला काही कामानिमित्त फोन करत होते. मात्र, तो फोन उचलत नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी थेट तो राहत असलेल्या ठिकाणी आले. पुण्यातील किकवी या गावी रज्जाक राहत होता. घटनास्थळी आल्यानंतर नातेवाईकांना रज्जाक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.