धक्कादायक ! गाडी अडवून मुंबईतील पर्यटकाला मारहाण करून लुबाडले

पिंपरी: लोणावळा परिसरात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील तरुणाची चारचाकी गाडी अडवून त्याला मारहाण करत त्याच्याजवळ रोख रक्कम लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भुशी येथील एका रिक्षा स्टँड जवळ हा प्रकार घडला. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे पर्यटकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

याप्रकरणी वेदांता सितष किसन चंदानी (वय २४, रा. वरळी, मुंबई) या तरुणाने तक्रार दिली असून चार अनोळखी व्यक्तीविरोधात लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी हे मैत्रिणीसह चारचाकी गाडीतून रोडणे ॲम्बी व्हॅलीच्या दिशेने जाण्यासाठी निघाले होते. त्यांचा रस्ता चुकल्याने ते भुशी रामनगर परिसरात गेले होते. तिथून परत येत असताना एका इसमाने त्यांची गाडी अडवली. तसेच “गाडीतून जर का खाली उतरला नाही तर गाडी फोडेल” अशी धमकी देऊन फिर्यादीला अशि धमकी देऊन फिर्यादीला गाडीतुन खाली उतरण्यास भाग पाडले.

फिर्यादी गाडीतुन खाली उतरल्यानंतर संबंधित व्यक्तीने त्यांना लाकडाने बेदम मारहाण करत पैशाची मागणी केली. त्यानंतर फिर्यादीने गाडीतून पॉकेट आणत संबंधित इसमाला २५०० रुपये दिले. फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर लोणावळा शहर पोलिसांनी याप्रकरणी चार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.