serial rapist taxi driver punishment for 384 years

युवक आपला पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच युवतीने आपल्या दुचाकीचा वेग वाढवला. त्याच दरम्यान आरोपी युवकाने आपल्या गाडीचा वेग वाढवला. दुचाकी वेगवान असल्याने काही अंतरावर जाताच युवतीची दुचाकी स्लीप झाल्याने युवती पडली, यावेळी पाठलाग करणाऱ्या युवकाने पीडितेजवळ येऊन तिचे कपडे फाडले आणि तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

    पुणे: मागील काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असलेल्या दिसून येत आहेत. नुकतीच शहरातील मुंढवा परिसरातून संतापजनक घटना समोर आली आहे. आयटी कंपनीत काम करून घरी परतणाऱ्या युवतीचा पाठलाग करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.
    हाती आलेल्या माहितीनुसार २७ वर्षीय युवती एका नामांकित आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहे. घटनेच्या दिवशी रात्रपाळी संपवून घरी परतत असताना परिसरात एका अज्ञात युवकाने युवतीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. युवक आपला पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच युवतीने आपल्या दुचाकीचा वेग वाढवला. त्याच दरम्यान आरोपी युवकाने आपल्या गाडीचा वेग वाढवला. दुचाकी वेगवान असल्याने काही अंतरावर जाताच युवतीची दुचाकी स्लीप झाल्याने युवती पडली, यावेळी पाठलाग करणाऱ्या युवकाने पीडितेजवळ येऊन तिचे कपडे फाडले आणि तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

    ही सर्व घटना अचानक घडल्याने घाबरलेल्या युवतीने आरडाओरडा करायला सुरुवात केली. तेव्हा सोसायटीचा सुरक्षा रक्षक तिच्या मदतीला धावून आला. त्यानंतर आरोपी युवक घटनास्थळावरून फरार झाला. घटने दरम्यान आरोपीने अंगात शर्टही घातला नव्हता शिवाय तोंडाला मास्क लावून चेहरा झाकला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.