धक्कादयक ! दुचाकीस्वार चोरट्यांनी दोन मोबाईल पळवले

मोबाईल द्वारे कॅब बुक करत असताना एका दुचाकीवरून तीन चोरटे आले. त्यांनी बोदक यांच्या हातातील ११ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेले.

    पिंपरी: रस्त्यावर थांबून मोबाईलद्वारे कॅब बुक करत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी एकाच्या हातातील दोन मोबाईल हिसकावून नेल्याची घटना भुजबळ चौक, वाकड येथे घडली. प्रमोद गुलाब बोदक (वय ४४, रा. दापोडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    फिर्यादी बोदक हे रात्री सव्वाअकराच्या सुमारास वाकड येथील भुजबळ चौकात ओला कॅब बुक करत होते. मोबाईल द्वारे कॅब बुक करत असताना एका दुचाकीवरून तीन चोरटे आले. त्यांनी बोदक यांच्या हातातील ११ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेले. सहायक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम तपास करत आहेत.