धक्कादायक! पवना नदीत पडलेल्यां चौघांपैकी दोघांचा बुडून मृत्यू

पवना नदीच्या काठावरून थेरगावकडे जात होते. त्यावेळी पळा- पळा असा ओरडण्याचा आवाज आला. आवाज ऐकून चौघा जणांनी नदीत उडी मारली. त्यानंतर रवी आणि नरसिंग हे दोघेजण पोहून बाहेर आले. दरम्यान, पिंटू आणि ओम हे दोघेजण पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

    पिंपरी: थेरगाव स्मशानभूमीजवळ पवना नदीमध्ये पडलेल्या चौघांपैकी दोघेजण बुडाल्याची घटना घडली आहे. उर्वरित दोघे पोहत बाहेर आल्याचे समोर आली आहे. दोघांचे मृतदेह सापडले आहेत. पिंपरी चिंचवड़ महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी हे मृतदेह सोमवारी बाहेर काढले आहेत.

    पिंटू विठ्ठल गायकवाड (वय ३५) आणि ओम प्रकाश जाधव (वय २५, सर्व रा. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर कॉलनी, काळेवाडी) अशी नदीत बुडालेल्या दोघांची नावे आहेत. तर रवी राजकुमार गायकवाड (वय १३), नरसिंग महादेव जाधव (वय २१) हे दोघेजण पोहून सुखरूपाने बाहेर आले आहेत.

    याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, रविवारी दुपारी हे चौघेही खेळण्यासाठी गेले होते. खेळून चौघेही पवना नदीच्या काठावरून थेरगावकडे जात होते. त्यावेळी पळा- पळा असा ओरडण्याचा आवाज आला. आवाज ऐकून चौघा जणांनी नदीत उडी मारली. त्यानंतर रवी आणि नरसिंग हे दोघेजण पोहून बाहेर आले. दरम्यान, पिंटू आणि ओम हे दोघेजण पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र अंधार पडल्याने रविवारी ही शोध मोहीम थांबविण्यात आली. सो बुडालेल्या तरुणांपैकी पिंटू याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलिसांच्या उपस्थितीत हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर ओम याचा शोध सुरु केला. ओमचा दे मृतदेह सापडला. दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.